Type Here to Get Search Results !

“कुठे तरी गाजर दाखवल म्हणून हा प्रकल्प...”; अजित पवार यांचा मुख्यमंत्र्यावर मोठा आरोप!



जळगाव : मुख्यमंत्र्यांचे वरिष्ठांशी चांगले संबंध आहेत. त्यांच्या आशीर्वादाने ते मुख्यमंत्री झाले आहेत. आता त्यांनी हा प्रकल्प राज्यात आणावा असा वेदांता प्रकल्पावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. 



पवार म्हणाले, हा प्रकल्प बाहेर जात असेल तर कुठे तरी गाजर दाखवल जात असल्याचा आरोप करत हा प्रकल्प आधी आणावा आणि दुसरा प्रकल्प उभारायचा असेल तर उभारा. प्रकल्पासंदर्भात कुणीही राजकारण करू नये. राज्याच्या हिताचे जे जे प्रकल्प असतील ते प्रकल्प राज्यात आले पाहिजे; असे मत पवार यांनी व्यक्त केले.



दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज (ता. १५) जळगाव जिल्ह्यात आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत चाळीसगाव, पाचोरा व जळगाव येथे मेळावे होणार आहेत. जळगावात आगमन झाल्यानंतर ते बोलत होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies