Type Here to Get Search Results !

इन्स्टाग्रामवर ‘या’ हॅशटॅगला चुकूनही क्लिक करु नका, नाहीतर....!



मुंबई: लोकप्रिय सोशल मीडिया अॅप इन्स्टाग्रामवर काल, बुधवारपासून #embeded असा हॅशटॅग इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. या हॅशटॅगवर क्लिक केलं तरी आपलं अकाऊंट आपोआपच लॉगआऊट होतं. काल, दिवसभर हा ट्रेंड इन्स्टाग्रामवर सुरू होता. 



माहितीनुसार, काल, दिवसभर #embeded हा हॅशटॅग इन्स्टाग्रामवर ट्रेंड होत होता. अनेक पोस्टमध्ये हा हॅशटॅग शेयर करत यावर क्लिक करण्याचे आवाहन केले गेले. या हॅशटॅवर ज्यांनी क्लिक केले  त्यांचे अकाऊंट अचानक लॉगआऊट झाले. यानंतर ज्यांना आपल्या अकाऊंटचा पासवर्ड माहिती होता, त्यांनी पासवर्ड परत टाकून आपलं अकाऊंट पुन्हा लॉग इन केलं. पण अनेक यूजर्सना त्यांच्या इन्स्टाग्रामचा पासवर्ड माहिती नव्हता त्यांना मात्र एकतर पासवर्ड रीसेट करावा लागला किंवा त्यांच अकाऊंट गमवावे लागले  आहे. 



दरम्यान,  जेव्हा एखादा यूजर #Embeded या हॅशटॅगवर क्लिक करतो, तेव्हा इन्स्टाग्रामच्या अॅममध्ये टेक्निकल ग्लिच किंवा एरर येतो. यामुळे इन्स्टाग्रामचे अॅप हे अचानक लॉगआऊट होते. यामुळे आपल्या अकाऊंटला धोका निर्माण होऊन ते हॅकही होऊ शकते. त्यामुळे अशा हॅशटॅगवर क्लिक न करण्याचे आवाहन जाणकारांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies