Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, गुरुवार १५ सप्टेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

 


मेष: विद्यार्थ्यानी स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा. काम करताना मनात कोणतीही शंका आणू नका. व्यायामाचा कंटाळा करू नका. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. 



वृषभ:

जोडीदाराच्या गरजांकडे लक्ष द्यावे. बोलण्यातील कटुता टाळा. शासकिय गोष्टींना मान्यता मिळेल.  जुन्या पुस्तकांचे वाचन कराल. मानसिक चंचलतेला आवर घालावी. 



मिथुन:

महत्त्वाच्या वस्तु सांभाळाव्यात.  बोलण्यातून समोरच्यावर छाप पाडाल. कामाच्या ठिकाणी कौतुकाची थाप पाठीवर पडेल. सरकारी कामे मार्गी लागतील. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. 



कर्क:

कामा निमित्त छोटे प्रवास घडतील.  उत्तम वाहन सौख्य लाभेल. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. शांत विचाराने कामे पूर्ण करा. मुलां प्रतीच्या जबाबदार्यार पार पाडाल. 



सिंह:

जोडीदाराची मानसिकता समजून घ्या.  आपल्या निर्णयावर ठाम राहाल. धाकट्या भावंडाचे सहकार्य लाभेल. नम्रपणे बोलून आपला मान राखाल. राजकीय संपर्कातून लाभ होईल. 



कन्या:

उत्तम स्त्री सौख्य लाभेल. त्यामुळे शारीरिक थकवा जाणवू शकतो. कामाच्या शोधात असणार्यां ना दिलासादायक दिवस. कामाचा ताण वाढता राहील.  व्यवसायिकांना संपर्कातून लाभ होईल.



तूळ:

आर्थिक व्यवहार सावधानतेने करावेत. आपले मत अधिक स्पष्टपणे मांडाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. जवळचा प्रवास घडेल. हसत खेळत वागणे ठेवाल. 



वृश्चिक:

समोरील कामाकडे अधिक लक्ष द्यावे. दिवस माध्यम फलदायी असेल. बोलण्यात माधुर्य ठेवल्यास कामे सुरळीत पार पडतील. नातेवाईकांना नाराज करू नका. आरोग्याची वेळीच काळजी घ्यावी.



धनू:

सासरच्या मंडळींकडून लाभ होतील. विरोधक नरमाईची भूमिका घेतील. नवीन व्यावसायिक संपर्क लाभदायक ठरतील. नातेवाईकांमध्ये कौतुकास पात्र व्हाल. व्यायामाचा कंटाळा करू नका.



मकर:

कौटुंबिक वातावरण काहीसे तप्त राहील. समोरच्या व्यक्तीची साशंकता दूर कराल. जुने मित्र भेटल्याने मन प्रसन्न राहील. आहाराची पथ्ये पाळावीत. धार्मिक बाजू भक्कम कराल. 



कुंभ:

नवीन ओळखी वाढवाव्यात. अचानक प्रवास संभवतो. मनातील इच्छा पूर्ण होतील. संयमाने कार्यरत राहाल. भागीदारीतील गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्या.



मीन:

काही कुरबुरी चर्चेतून दूर कराव्यात.  जुनी व्यावसायिक कामे मार्गी लागतील. प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळेल. अनावश्यक खर्च दूर ठेवा. मुलांच्या जबाबदाऱ्या  पार पडण्यात दिवस निघून जातील. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies