Type Here to Get Search Results !

कॉलेजला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अपहरण करुन केला अत्याचार!



मुंबई: मुंबईत एका अल्पवयीन मुलीचे वडाळा येथून अपहरण करुन तिच्यावर पुणे एक्सप्रेस वे येथील झाडीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, मुंबईतील वडाळा पूर्व परिसरात ही मुलगी राहते. ५ सप्टेंबर ला पीडित मुलगी कॉलेजला जाण्यासाठी निघाली होती. पीडित मुलगी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था, वडाळा येथे पोहचली असताना आरोपी विशाल विरकर हा बोलेरो गाडी घेऊन तेथे आला होता. यावेळी त्याने मुलीला आपल्या गाडीत जबरदस्तीने बसवले. यानंतर तो पीडित मुलीला पुणे एक्सप्रेस वे येथील झाडीत घेऊन गेला. याठिकाणी त्याने पीडितेला धमकावून आणि मारहाण करत तिच्यावर त्याने अत्याचार केले असा आरोप पीडितेने केला आहे.



दरम्यान, या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार कंळबोली पोलिस ठाण्यात सुरवातीला गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies