Type Here to Get Search Results !

वर्षा उसगावकर यांनी मागितली कोळी समाजाची माफी; जाणून घ्या काय आहे प्रकरण...!

 


मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री वर्षा उसगावकरने मधल्या वेळात एका ऑनलाईन मासे विकणाऱ्या वेब पोर्टलची जाहिरात केली होती. सध्या त्यासंबंधीत वादंग उसळलेला दिसत आहे. वर्षाने या जाहिरातीत 'बाजारात बऱ्याच वेळा कोळणींकडून माझी फसवणूक झाली आहे. बाजारातल्या पापलेटला इतका घाणेरडा वास येतो की, त्यावेळी मी हे पापलेट का घेतले, असे वाटून निराश झाले' अशी विधान केली आहे. या विधानांवरून मासेमारांनी वर्षा उसगावकरवर संताप व्यक्त केला आहे. लगेचच वर्षाने माफीचा व्हिडिओ शेअर करत समस्त कोळी बांधवांची माफी मागितली आहे. तसेच कोणाच्या भावना दुखवण्याचा हेतू ही नव्हता, असे ही ती या व्हिडिओमध्ये म्हणाली आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies