Type Here to Get Search Results !

बाप्पाच्या दर्शनासाठी स्कर्ट घालून आली ‘हि’ प्रसिद्ध गायिका; मंडळाकडून शाल देऊन बाप्पाच्या दर्शनाची दिली परवानगी!



मुंबई: मुंबईत सर्वत्र गणेश उत्सवाची धामधूम पहायाला मिळत आहे. सिने क्षेत्रातील अनेक कलाकार मुंबईतील प्रसिद्ध गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जात असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील प्रसिद्ध अशा गणपतींपैकी एक असणाऱ्या अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी प्रसिद्ध गायिका लीसा मिश्रा यांनी उपस्थिती लावली होती.



मात्र, लीसा मिश्रा या शॉर्ट कपडे घालून आल्यामुळे त्यांना मंडळाकडून शाल देण्यात आली आणि त्यानंतरच लीसा मिश्रा यांना गणपती बाप्पाचे दर्शन घेता आले आहे.



दरम्यान, अंधेरी राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांनी पूर्ण शरीर झाकतील अशी कपडे परिधान करावीत असा नियमच मंडळाने मागील १२ वर्षांपासून केला असल्याचं मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे, अंधेरीचा राजाच्या दर्शनासाठी प्रसिद्ध गायिका लिसा मिश्रा आली असता त्यांनी घातलेला  स्कर्ट लहान असल्यामुळे त्यांना मंडळाने शाल देत आपण पुर्ण कपडे असल्याशिवाय दर्शन देत नसल्याचे सांगून त्यांना गणपती दर्शनासाठी पुढे पाठवल्याचेही मंडळाकडून सांगण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies