Type Here to Get Search Results !

“उद्यापासून रामदास कदम यांना राज्यात फिरू देणार नाहीत”: ‘या’ महिला नेत्याचा इशारा!



मुंबईः रामदास कदमांच्या विरोधात उद्यापासून शिवसेनेकडून राज्यभरात आंदोलन सुरु होत आहेत, अशी माहिती शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली. कदम यांच्या वक्तव्यावरून दुखावलेले शिवसैनिक उद्यापासून रामदास कदम यांना राज्यात फिरू देणार नाहीत, असा इशाराही सुषमा अंधारे यांनी दिला आहे. 



तसेच त्य पुढे म्हणाल्या, “ज्यांच्या मांडीवर जाऊन बसताय.. तीच लोकं तुमचा पगार किती… तुमची निष्ठा किती असा सवाल करत होते, पण त्याकडेही तुम्ही लक्ष देत नाहीयेत, असे वक्तव्य करत सुषमा अंधारे यांनी भाजपसहित रामदास कदमांवर हल्लाबोल केला.



याशिवाय, ज्या मराठवाड्यात तुम्ही शिवसेना संपर्कप्रमुख होतात, त्याच मराठवाड्यातील लातूर आणि बीडमध्ये, तुम्ही खरंच येऊन दाखवा, असेही वक्तव्य त्यांनी केले आहे.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies