Type Here to Get Search Results !

शारीरिक संबंधांना नकार दिल्याने तरुणाने केले भयंकर कृत्य!



नाशिक : नाशिकच्या टाकळी रोड परिसरात पिडीतेचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विनयभंग केला आहे. या प्रकरणी नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात रोहन बंजारा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून भद्रकाली पोलीसांकडून अधिकचा तपास केला जात आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, पीडितेला फ्लॅटमध्ये एकटी गाठून शारीरिक संबंधांची मागणी रोहन बंजारा याने केली होती. शरीर सुखाची मागणी केल्यांनतर नकार दिल्याने तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. हा संपूर्ण प्रकार 01 जून ते 19 सप्टेंबर या कालावधीत घडल्याची माहिती समोर येत आहे. संशयित रोहन बंजारा हा मूळचा नंदुरबार जिल्ह्यातील असून तो गेल्या अनेक महिन्यांपासून नाशिकमध्ये राहत होता.



दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची तक्रार पीडितेने नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात दिली आहे त्यावरून भद्रकाली पोलीसांनी रोहन बंजारा याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies