Type Here to Get Search Results !

मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या डॉक्टरचा पाण्यात बुडून मृत्यू!

 


बीड: बीडच्या माजलगाव लगत असणाऱ्या केसापुरी कॅम्प परिसरातील धरणावर मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या डॉक्टरचा दम लागल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव दत्ता फपाळ असे आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, डॉ. दत्ता फपाळ हे माजलगाव तालुक्यातील बेलुरा येथील रहिवासी आहेत. ते आपल्या मित्रांसोबत आज माजलगावच्या धरणावर पोहण्यासाठी गेले होते मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने पोहतांना त्यांना दम लागला आणि डॉ. फपाळ पाण्यात बुडाले. त्यांच्यासोबत पोहायला गेलेल्या मित्रांनी त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांना यश न आल्याने मित्रांत्या डोळ्यांदेखत डॉक्टर पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.



दरम्यान घटनेची माहिती मिळताच माजलगावच्या तहसीलदार आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आणि  NDRF च्या पथकाला पाचारण करण्यात आले असून त्यांचा अद्याप शोध सुरू आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies