Type Here to Get Search Results !

आमदार बच्चू कडू यांना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात!



मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार बच्चू कडू यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात मरीन ड्राइव्ह पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बच्चू कडूंना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात आहेत.



दरम्यान, राजकीय आंदोलनाप्रकरणी कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यालयाने आमदार कडू यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावला होता. बच्चू कडू आज न्यायालायासमोर हजर झाले असता त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. हा अर्ज न्यायालायने फेटाळून लावला आहे. जामीन अर्ज फेटाळत बच्चू कडू यांना न्यालयीन कोठडी सुनावल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies