Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

 


मेष :

शांत राहून कामे करा. संमिश्र घटना घडू शकतात. अधिकार्‍यांशी मतभेद संभवतात. काही बाबतीत लाभ मिळू शकतात. रागावर नियंत्रण ठेवावे.



वृषभ:

सरकारी नोकरदार वर्गाने शांततेचे पालन करावे.  कुटुंबातील लोकांसोबत वेळ चांगला जाईल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. लाभाच्या संधी उपलब्ध होतील. अधिक परिश्रम घेण्याची गरज भासेल. 



मिथुन:

जोडीदाराबरोबर मतभेद टाळावेत. संभ्रमात अडकून राहू नका. मित्रांशी सुसंवाद साधता येईल.  विनाकारण खर्च करू नका. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. 



कर्क:

दिवस शुभ फलदायी ठरेल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. नातेवाईकांची गाठ पडेल.  जुनी येणी वसूल होतील. हातातील कामे पूर्ण करण्यात दिवस जाईल. 



सिंह:

कठोर मेहनत घ्यावी लागेल. व्यावसायिक ठिकाणी अधिकार प्राप्त होतील. अनामिक भीती लागून राहील. आपले म्हणणे लोकांना पटेल. विरोधकांच्या कारवायांकडे लक्ष ठेवा. 



कन्या:

उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.  बोलण्यातून लोकांना आपलेसे करा. अति श्रमाचा थकवा जाणवेल. हाती घेतलेल्या कामात यश येईल. कामाचे योग्य नियोजन करावे. 



तूळ:

प्रवास काळजीपूर्वक करावा. प्रकृतीची काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. एखादी महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 



वृश्चिक:

सरकारी कामे अडकण्याची शक्यता. प्रिय व्यक्तीचे मत टाळू नका. निराशाजनक विचार टाळा. हातातील काम पूर्णत्वास न गेल्याने चिडचिड होईल. अधिकार्‍यांशी मतभेद होण्याची शक्यता. 



धनू:

घरगुती प्रश्न लक्षात घ्या. घरगुती गोष्टींसाठी पैसे खर्च होतील. जुनी येणी प्राप्त होतील.  कोणत्याही गोष्टीची अति घाई करू नका. कामातून समाधान लाभेल. 



मकर:

पैज जिंकता येईल. सर्व अटी तपासून पहा. समस्येतून मार्ग काढाल. वैवाहिक जीवन उत्तम राहील. भागीदारीच्या व्यवसायात चोख रहा.  



कुंभ:

महिला वर्गासाठी विशेष दिवस. मानसिक स्थिती भक्कम करा. वैवाहिक जीवन सुलभ असेल.  अनावश्यक खर्चात वाढ होईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. 




मीन:

पथ्यपाणी वेळेवर सांभाळा. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. आरोग्याची काळजी घ्यावी. मुलांबरोबर दिवस मजेत घालवाल. एखाद्या स्पर्धेत यश मिळवाल. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies