Type Here to Get Search Results !

‘येथील’ विद्यापीठाच्या हॉस्टेलमधील ६० तरुणींचे अंघोळीचे व्हिडिओ केले व्हायरल; अन मुलीनी.....!



चंदीगढ, पंजाब: पंजाबच्या चंदीगढ विद्यापीठाच्या मोहाली येथील मुलींच्या वसतीगृहातील सुमारे ६० मुलींचा आंघोळ करतानाचे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. यामुळे विद्यापीठातील ८ मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून यातील एक मुलीची प्रकृती गंभीर आहे. तसेच, या मुलीचे व्हिडिओ बनवणारी व्यक्ती त्यांच्याच हॉस्टेलमध्ये राहणारी एक विद्यार्थिनी आहे. या विद्यार्थिनीने वसतीगृहातील इतर मुलीचे व्हिडिओ बनवून एका तरुणाला पाठवले, जे त्याने इंटरनेटवर व्हायरल केले आहेत. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, पंजाबमधील मोहाली येथील चंदिगढ विद्यापीठात काल रात्री अडीच वाजता मोठा गोंधळ झाला. मुलींच्या वसतिगृहात एका विद्यार्थिनीने ६० विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवून एका तरुणाला पाठवला. तरुणाने हा व्हिडिओ इंटरनेट मीडियावर व्हायरल केला. या प्रकरणाची माहिती मिळताच वसतिगृहात राहणाऱ्या आठ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या आठ विद्यार्थिनींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



दरम्यान,  याबाबत कॉलेज व्यवस्थापनाकडे तक्रार केली, मात्र कॉलेज व्यवस्थापनाने याबाबत कोणतीही कारवाई केली नसल्याचे विद्यार्थिनींचे म्हणणे आहे. तसेच,  विद्यापीठातील विद्यार्थिनींच्या गोंधळाची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस फौजफाट्यासह विद्यापीठाजवळ पोहोचले. यावेळी पोलिसांना विद्यार्थिनींच्या रोषाचा आणि विरोधाचा सामना करावा लागला. पोलिसांनी व्हिडिओ पाठवणाऱ्या तरुणीला ताब्यात घेतले आहे. आठ तरुणींपैकी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies