Type Here to Get Search Results !

“मोदीजींनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला....”; पंकजा मुंडें!



बीड :काँग्रेस पक्षात वंशवादाचे राजकारण सुरू आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. त्याचा अर्थ असा नाही की, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी एक क्षण विचार केला आणि यामध्ये मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. मला कोणी संपवू शकत नाही, मला कोणी संपवायचे झाले तर मला कोणीही संपवू शकत नाहीत. मोदीजींनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला, तर ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत. जर मी तुमच्या मनावर राज्य केले तर...., असेही पंकजा मुंडे यांनी वक्तव्य केले.



दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवडानिमित्त बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथे आयोजित "समाजातील बुद्धिजिवी लोकांच्या सोबत संवाद" या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी खासदार प्रीतम मुंडे यांची विशेष उपस्थिती होती.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies