Type Here to Get Search Results !

काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण?; ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री यांनी केला मोठा खुलासा!



नवी दिल्लीः काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री यांनी मात्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत खुलासा केला आहे. ही निवड प्रक्रिया पूर्णपणे खुली आणि पारदर्शी असल्यामुळे पक्षाकडे आता अध्यक्षनिवडीबाबत लपवण्यासारखे काहीच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दीर्घ कालखंडानंतर गांधी कुटुंबीय सोडून हे पद इतर व्यक्तीला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पक्षात निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे, मात्र याबाबत अनेक सवालही उपस्थित केले जात आहेत.



काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्रींनी सांगितले की, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 9 हजार मतदार काँग्रेस अध्यक्ष पदासाठी मतदान करणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणूक ही पूर्णपणे स्वतंत्र प्रक्रिया असून त्यासाठी पक्षाकडे आता लपवण्यासारखे काहीच नाही.  तसेच, ते  म्हणाले की, ज्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अर्थात काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायचा आहे,ते 20 सप्टेंबरपूर्वी प्रतिनिधींची यादी पाहू शकतात. अध्यक्षपदासाठी अर्ज भरताना मात्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या 10 प्रतिनिधींचा पाठिंबा दर्शवावा लागणार आहे.



दरम्यान, काँग्रेस कार्यकारिणीच्या निवडून आलेल्या 12 सदस्यांपेक्षा अधिक उमेदवार असतील तर मात्र निवडणूक होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची सूचना 22 सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. तर 24 ते 30 सप्टेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्रांची छाननी करुन 17 ऑक्टोबर रोजी निवडणूक होण्याची शक्यता आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies