Type Here to Get Search Results !

“एकनाथ शिंदेंमुळे उद्धव ठाकरेंचा फायदा झाला, सगळे आजार झाले गायब...”: यांची उद्धव ठाकरे टीका!




औरंगाबाद : मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाच्या मंत्री आणि आमदारांचा मेळावा औरंगाबाद येथे पार पडला. या मेळाव्यात पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.



संदीपान भुमरेंनी म्हटलं की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टीव्ही चालू झाल्यानंतर दिसायचे आणि टीव्ही बंद झाला तेही बंद व्हायचे. मी कॅबिनेट मंत्री असताना मुख्यमंत्री केवळ पाच-सहा वेळा मंत्रालयात आले. बाकी सर्व कॅबिनेट ऑनलाईन झाली, मात्र  एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यावर उद्धव ठाकरेंचा बेल्ट गेला, खुर्ची गेली. त्यांना मोठा डॉक्टर भेटला आहे. आता ते म्हणतात का माझं ऑपरेशन झालं, मान दुखते असं म्हणत नाहीत. एकनाथ शिंदेंमुळे तुमचा किती फायदा झाला, घरातील सगळे आजार गायब झाले. एकनाथ शिंदेंमुळे तुमचा तेजस बाहेर आला, आदित्य बाहेर आला, अशी टीकाही त्यांनी केली.



दरम्यान, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वालांसह इतर आमदार या मेळाव्याला उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies