Type Here to Get Search Results !

मनी लॉण्डरिंग प्रकरणी नोरा फतेहीची कसून चौकशी!



मुंबई :मनी लॉण्डरिंगमध्ये अटक केलेल्या सुकेश चंद्रशेखर प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची इडीने बुधवारी चौकशी केली. त्यानंतर आज १५ सप्टेंबरला EOW ने अभिनेत्री नोरा फतेहीची कसून चौकशी केली. या प्रकरणातील महत्वाची सूत्रधार पिंकी ईरानी नोरासोबत चौकशीदरम्यान हजर होती.



दरम्यान, ईडीने केलेल्या तपासानंतर तसेच महत्वाचे पुरावे हाती लागल्यानंतर नोरा फतेहीला महत्वाचे प्रश्न विचारण्यात आले. एका इव्हेंटबद्दल नोराची चौकशी करण्यात आली. २०२२ मध्ये नोरा या इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. हा इव्हेंट चेन्नईत झाला होता. त्यानंतर पोलिसांनी सुकेशसोबत केलेल्या चॅटिंगबद्दल नोराची विचारपूस केली होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies