Type Here to Get Search Results !

बिछान्यावर झोपलेल्या दोन भावंडाचा सर्पदंशाने उपचारादरम्यान मृत्यू!



भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द येथे घरात झोपलेल्या दोन भावंडांचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. सुशील बलवीर डोंगरे (वय ८) व उत्कर्ष बलवीर डोंगरे (वय ११) असे मृत भावंडाचे नाव आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, दोन्हीय भाऊ रात्री एकाच बिछान्यावर झोपले होते. रात्री मागच्या दारातून साप आत आला. तो बिछान्यावर चढला असता त्या सापाने दोघाही भावांना दंश केला. काहीतरी चावल्याचा भास झाल्याने जाग आली. पाहिले असता साप चावल्याचे लक्षात आले. 


दरम्यान, दोघाही भावांना उपचारासाठी आधी तुमसर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. भंडारा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असता उपचारादरम्यान थोरला भाऊ उत्कर्ष बलवीर डोंगरे धाकटा भाऊ सुशील बलवीर डोंगरे यांचा मृत्यू झाला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies