Type Here to Get Search Results !

अमित शाह अन् राज ठाकरेंची भेट होणार?; भाजपा आणि मनसेच्या युतीचा नारळ फुटणार?



मुंबई- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे ५ सप्टेंबरला मुंबईत येत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना शाह मार्गदर्शन करतील, अशीही शक्यता आहे. तसेच, राजकीय बैठक होईलच, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.



दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी असलेल्या शिंदेगट आणि भाजपाच्या नेत्यांकडून मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या सातत्याने भेटीगाठी घेतल्या जात आहेत. तसेच अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान अमित शाह आणि राज ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, भाजपा आणि मनसे युतीचा नारळ फुटणार असल्याची चिन्हे दिसून येत आहे. त्यामुळे, भाजपा आणि मनसेकडून अमित शाह आणि राज ठाकरे यांची भेट होण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies