Type Here to Get Search Results !

महिलांच्या शौचालयात डोकावून पाहत होता म्हणून.....!



मुंबई: मुंबईच्या पवईतील आयआयटी बॉम्बेमधील शौचालयाच्या खिडकीतून आरोपी डोकावत असल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलांच्या शौचालयात डोकावणाऱ्यास पवई पोलिसांनी अटक केली आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, पवईच्या आयआयटी बॉम्बेची एक विद्यार्थिनी शौचालयात असताना खिडकीतून आरोपी डोकावत असल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री सदर घटना उघडकीस आली आहे. सदर प्रकारानंतर आयआयटी बॉम्बेमधील विद्यार्थीनीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. 



दरम्यान, आयआयटी बॉम्बेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पिंटू गरिया नामक या आरोपी व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पिंटू गरिया असे कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती कॅन्टीनमध्ये काम करणारा कर्मचारी आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies