Type Here to Get Search Results !

राज्य शासनाकडून 'या' विषयात संशोधन करणाऱ्या मुलांना मिळणार जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात संशोधनाची संधी!मुंबई: महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानमार्फत जैवविविधता विषयात संशोधन करणाऱ्या ७५ मुलांना जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात जाऊन संशोधन करण्यासाठी येत्या ३ वर्षात शिष्यवृत्ती देण्यात येईल. याशिवाय अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कांदळवन क्षेत्रात ७ हजार ५०० नवीन रोजगार निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.दरम्यान, महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाची ५ वी बैठक आज सहयाद्री अतिथीगृह येथे मुनगंटीवार अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies