Type Here to Get Search Results !

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त ‘येथे’ मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन!



मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबई भारतीय जनता पार्टीच्या खासदार, आमदार, नगरसेवक पदाधिकाऱ्यांच्या वतीने मुंबई शहर आणि उपनगरात ४१५ मोफत आरोग्य शिबिराचे शनिवारी आयोजन करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी केले आहे.



दरम्यान, यामध्ये स्वच्छता अभियान, मन की बात कार्यक्रम, महापुरुषांच्या पुतळ्यांची सफाई, बूस्टर डोस, मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, आयुर्वेदिक नॅचरोपॅथी, मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप, सार्वजनिक विहिरीची स्वच्छता, मोफत धान्य वाटप, बुद्धीजीवी संमेलन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनानावरील प्रदर्शनी अश्या उपक्रमांचा समावेश आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies