मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना आज देखील जामीन मिळालेला नसूनत्यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. संजय राऊतांना 4 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत त्यांची न्यायालयीन कोठडी आज संपत असल्याने त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. मात्र आज देखील त्यांच्या कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे.