Type Here to Get Search Results !

राज्यात 'या' जागांसाठी होणार विधानपरिषद निवडणूक!



मुंबई: राज्यात विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. नाशिक आणि अमरावती विभागात पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभागात शिक्षक कोट्याची निवडणूक होणार आहे. १ नोव्हेंबरपासून निवडणूक प्रक्रियेला सुरूवात होईल तर ३० डिसेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. एकूण पाच जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 



दरम्यान, विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे, बाळाराम पाटील, ना.गो.गाणार तर पदवीधर मतदार संघाचे डॉ. रणजित पाटील, डॉ. सुधीर तांबे यांचा कार्यकाल ७ फेब्रुवारी २०२३ रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies