Type Here to Get Search Results !

व्हिडीओ:'ब्रह्मास्त्र'चा नवा टिझर रीलीज; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित!



मुंबई: बॉलिवूड दिग्दर्शक अयान मुखर्जींचा बहुप्रतिक्षित 'ब्रह्मास्त्र' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलीकडेच चित्रपटाचा ट्रेलर आणि गाण्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधले होते. 


प्रसिद्ध दिग्दर्शक- निर्माता करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 'ब्रह्मास्त्र' ची एक छोटीशी झलक शेअर केली आहे 'गुरू आणि त्यांच्या प्रभास्त्रला फक्त ९ दिवसांत भेटा. ९ सप्टेंबरपासून सिनेमागृहात ...अशी कॅप्शन दिली आहे. व्हिडिओमध्ये अमिताभ तलवार प्रभास्त्राने लढताना दमदार भूमिकेत दिसत आहेत. बिग बींचा हा भन्नाट अवतार चाहत्यांना पंसतीस आला आहे. सोशल मीडियावर काही तासांतच चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.


दरम्यान, 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies