Type Here to Get Search Results !

हे गणपती बाप्पा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सदबुध्दी दे आणि..!



जळगाव : 'सद्यस्थितीत गणेशोत्सव सुरू आहे. बाप्पा हा बुद्धीचा देवता आहे. त्यामुळे या बुद्धीच्या देवतेला मी विनंती करतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुद्धी दे आणि मंत्रिमंडळाचा लवकर विस्तार कर तसेच प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री नियुक्त कर...' असे साकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी गणपती बाप्पाकडे घातले.



तसेच, राज्यातील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीच संकट कोसळल आहे. या संकटातून शेतकऱ्यांना मुक्त कर, देशावर जे महागाई संकट आहे, जगभरावर जे अनुवस्त्र युद्धाचं जे संकट आहे, ते बाप्पाने दूर करावं, विविध संकटातून देशाला राज्याला जगाला दूर करावं, शेतकऱ्याला समाधानी कर, अशी प्रार्थना बाप्पाकडे केली असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. 



दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा 2 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त जळगाव येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांचे ढोल ताशांच्या गजरात जल्लोशात स्वागत करण्यात आले. स्वागत सत्कारानंतर एकनाथ खडसे पत्रकारांशी बोलत होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies