Type Here to Get Search Results !

अल्पवयीन दोघी बहिणींवर बलात्कार; खून करून मृतदेह बांधले झाडावर!



लखीमपूर: उत्तरप्रदेशातील लखीमपूरी खैरी भागातील निघासन कोतवाली परिसरात दोन सख्या बहिणींवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. दोन अल्पवयीन सख्या बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले आहेत.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी दोन्ही अल्पवयीन मुलींना घरातून पळवून नेले, बलात्कार करून त्यांची हत्या करून मृतदेह झाडाला लटकवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मृत मुलींपैकी एक दहावीत शिकणारी तर दुसरी सातवीची विद्यार्थिनी आहे.


याप्रकरणी, मृत मुलींच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी 2 नामांकित आणि 3 अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोन अल्पवयीन सख्या बहिणींचे मृतदेह सापडल्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवत पोलीस स्टेशनला टाळे ठोकले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies