Type Here to Get Search Results !

लक्झरी आणि आयशर ट्रक मध्ये अपघात होऊन लागली आग; 10 ते 12 जणांचा आगीत होरपळून मृत्यू!

 


नाशिक : यवतमाळच्या पुसदहून मुंबईच्या दिशेने चिंतामणी लक्झरी आणि औरंगाबादच्या दिशेने जाणारा आयशर ट्रक यांच्यात अपघात घडला. अपघातानंतर बसला आग लागली. या आगीत प्रवाशांना जीव वाचण्यासाठी संधीही मिळाली नाही.माहितीनुसार, पहाटे पावण पाच-पाच वाजता चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसमधील मुंबईला जायला निघालेले प्रवासी झोपेत होते. अपघातानंतर बसलेल्या दणक्याने सर्व प्रवाशांचे डोळे उघडले. बसचा अपघात झालाय, हे कळेपर्यंत बसने पेट घेतला होता. व बसच्या आतला भाग आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला.जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरु असतानाच आगीच्या धुमश्चक्रीत 10 जण जिवंत होरपळले.
दरम्यान, 10 ते 12 जणांचा मृत्यू आगीत होरपळून झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. गाडीतील अन्य सामान आणि प्रवाशांची माहिती घेत, आता प्रशासनाकडून बचावकार्य केलं जात आहे. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.तसेच,सकाळी 6.30 वाजेपर्यंत ही बस पूर्णपणे जळून खाक झाली होती.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies