Type Here to Get Search Results !

‘या’13 शहरांमध्ये आजपासून सुरू होणार 5G सेवा; ‘इतक्या’ रुपयांत होणार , 5G रिचार्ज!



नवी दिल्ली:  टेलिकॉम क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. कारण, आजपासून देशात 5जी मोबाईल सेवा सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता या सेवेचे  उद्घाटन होणार आहे. पहिल्या टप्प्यात ही सेवा एकूण 13 शहरांमध्ये सुरू करण्यात येणार आहे.



यामध्ये दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, कोलकाता, जामनगर, लखनऊ, पुणे या शहरांचा समावेश आहे. दोन वर्षांनंतर 5G सेवेचा देशभरात झपाट्याने विस्तार केला जाईल.



दरम्यान, माहितीनुसार, 5G सेवेच्या रिचार्जसाठी सुरुवातीला 5G साठी 4G इतकीच किंमत मोजवा लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र टेलिकॉम कंपन्या 5Gच्या किंमतीत वाढ करतील, असा अंदाज बांधला जातोय.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies