Type Here to Get Search Results !

अवघ्या 34 व्या वर्षी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने केली आत्महत्या!




मुंबई - तामिळ चित्रपटसृष्टीतील ३४ वर्षीय सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि टीव्ही अभिनेता लोकेश राजेंद्रन असे या अभिनेत्याने आत्महत्या केली  आहे.



माहितीनुसार, लोकेशने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्याला 'मरमादेशम' या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. लोकेश विवाहित होता आणि त्याला दोन मुले आहेत. लोकेशच्या वडिलांनी सांगितले की, एक महिन्यापूर्वी मला समजले की लोकेश आणि त्याच्या पत्नीमध्ये काही वाद सुरू आहे. चार दिवसांपूर्वी पत्नीकडून घटस्फोटाची कायदेशीर नोटीस आली होती. या सगळ्या गोष्टींची त्याला खूप काळजी वाटत होती. लोकेशच्या वडिलांनी पुढे सांगितले की, मी शुक्रवारी त्याला शेवटचे पाहिले. त्याने आपल्याला काही पैशांची गेज असल्याचं सांगत वडिलांजवळून काही पैसे घेतले होते.



दरम्यान, अवघ्या 34 व्या वर्षी या टीव्ही अभिनेत्याने टोकाचे  पाऊल उचललल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies