Type Here to Get Search Results !

अंधेरीत ठाकरे गट विरुद्ध भाजप: भाजपकडून ‘यांचे’ नाव फायनल!



मुंबई: अंधेरी पूर्वची जागा शिंदे गट लढवणार की भाजप हा तिढा आता सुटला असून मुरजी पटेल यांना भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही जागा आता शिंदे गटाला न जाता या ठिकाणी भाजप निवडणूक लढणार आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल हा सामना रंगणार आहे. 



दरम्यान, काल संध्याकाळी वर्षा या निवासस्थानी भाजप नेते आशिष शेलार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. त्यामध्ये ही जागा भाजपला सोडण्यावर दोन्ही बाजूने एकमत झाले. त्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुरजी पटेल यांना कॉल करून कमळ या चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या सूचना दिल्या.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies