Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, शनिवार १५ ऑक्टोबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:

नात्यांमधील विश्वास वाढीस लागेल. घरात शुभ कार्य ठरेल. मित्रांचे उत्तम सहकार्य लाभेल.  वाहन विषयक काम निघेल. एखादी चांगली वार्ता मिळेल. 


वृषभ:

लहान प्रवास घडेल. मित्रांचे संपूर्ण सहकार्य लाभेल. मनातील इच्छेबाबत आग्रही राहाल. कर्तृत्वात वाढ होईल. मानसिक स्वास्थ्य जपावे.


मिथुन:

अपचनाचा त्रास संभवतो. विषयास अनुसरून बोलावे. अचानक धनलाभ संभवतो. कठीण कामे सुलभतेने पार पाडाल.  घरातील गोष्टींबाबत दक्ष राहावे. 


कर्क:

घाईने काम बिघडू शकते. भागीदारीत आंधळा विश्वास ठेऊ नका. दिवसाची सुरुवात आनंददायी होईल. दिनक्रमात बदल कराल. अति उत्साहाने कामे करू नका. 


सिंह:

कौटुंबिक गोष्टींसाठी खर्च कराल. तुमच्या मताला विरोध होऊ शकतो. भावनात्मक निर्णय टाळावा. निष्काळजीपणे वागू नका. मनाला न पटणार्‍या गोष्टीला होकार देऊ नका.

 

कन्या:

सर्वांशी प्रेमाने वागाल.  प्रिय व्यक्तीची गाठ पडेल. स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवावा. धावपळीचे योग्य वेळी लाभ मिळतील. कामातून आनंद शोधाल. 



तूळ:

एखादा नवीन अनुभव गाठीशी बांधाल. अघळपघळ बोलू नका. जन संपर्कातून लाभ होईल. स्वच्छ व स्पष्ट मत मांडा. हातातील सर्व कामे सुरळीत पार पडतील. 



वृश्चिक:

जास्त जबाबदारी अंगावर घेऊ नका. फसवणुकीपासून सावध रहा. रूचकर भोजनाचा आस्वाद घ्याल.  झोपेची तक्रार जाणवेल. तुमचे मत विचारात घेतले जाईल. 


धनू:

काळ आणि वेळ लक्षात घ्या. समोरच्याचा मान ठेवून वागा. दिग्गज मंडळींच्या भेटीचे योग येतील.  कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. 


मकर:

डोकेदुखीचा त्रास संभवतो. चांगल्या कामासाठी पैसा खर्च केला जाईल. घरातील गोष्टी चिघळू देऊ नका. वैवाहिक सौख्यात वाढ होईल. कामे पूर्णत्वास नेण्यास प्रयत्नशील रहा. 


कुंभ:

एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या भेटीचा योग. उत्तम लाभामुळे दिवस आनंदात जाईल. योग्य नियोजनाने काम पूर्णत्वास जाईल. विनाकारण तर्क-वितर्क करू नका. वडीलांची साथ मोलाची ठरेल. 


मीन:

अचानक आलेल्या अडचणी संयमाने सोडवा.  बोलताना शब्दांचे थोडे भान ठेवा. मेहनत व परिश्रम यांची कास सोडू नका. खर्चात वाढ होण्याची शक्यता. एखाद्या महत्वाकांक्षी योजनेस प्रारंभ कराल. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies