Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, सोमवार १० ऑक्टोबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!




मेष: 

कटू गोष्टी अनुकूल करण्याची कला शिकून घ्या. आपली चिडचिड इतरांना दाखवू नका. प्रिय व्यक्तीच्या भेटीचा योग. संयम बाळगून वागा. नकारात्मक घटना फार मनावर घेऊ नका. 


वृषभ:

नवीन ओळखीतून प्रतिष्ठा लाभेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन होईल. अप्रिय व्यक्तींची भेट त्रासदायक ठरेल. व्यवसायात नीतिचा मार्ग अवलंबा. आजचा दिवस समाधानकारक ठरेल. 



मिथुन:

जुनी कामे मार्गी लावाल. मित्र व नातेवाईकांशी सलोख्याने वागा. मुलांकडून शुभ वार्ता मिळेल. उगाच वाईटपणा घेऊ नका. मौल्यवान वस्तु जपाव्यात. 


कर्क:

कुटुंबातील सदस्य चांगली बातमी देतील. नवीन कामाकडे लक्ष ठेवा. मुलांच्या जबाबदार्‍या व्यवस्थित पार पाडाल.  जे मिळेल ते पदरात पाडून घ्या. सन्मानात वाढ होईल. 



सिंह:

कौटुंबिक तिढा सोडवायला मदत कराल. बोलण्यातून माधुर्य दर्शवाल.  आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. मिळकतीचा नवीन स्त्रोत उत्पन्न होईल. एखाद्या कामासाठी अधिक धावपळ करावी लागेल. 



कन्या:

व्यापारी क्षेत्रातील व्यक्तींना अपेक्षित यश मिळेल. जुन्या आजारांवर वेळीच लक्ष द्या. चांगल्या गोष्टीसाठी खर्च कराल. कोणतीही गोष्ट पुढे ढकलू नका. धनसंचयात वाढ होईल. 


तूळ:

घरातील लोकांचा आनंद द्विगुणित होईल. आनंदाची अनुभूति घ्याल. कार्यालयीन वातावरण अनुकूल राहील. एखादा मोठा व्यवहार पार पडेल. 


वृश्चिक:

अधिक धावपळ झाल्याने आराम करण्यावर भर द्यावा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वडिलोपार्जित धनाचा लाभ होईल. कोणत्याही संशयित कामात अडकू नका. पराक्रमात वाढ होईल. 


धनू:

सासरच्या व्यक्तींकडून लाभ मिळेल. एखाद्या व्यक्तीची भेट संस्मरणीय ठरेल. जुन्या धार्मिक कथांचे श्रवण कराल. मन:शांती लाभेल. विरोधक माघार घेतील. 


मकर:

जुने प्रयत्न फलद्रुप होतील. दिवस आनंदात जाईल. कार्यालयीन सदस्य कौतुक करतील. जुनी सर्व कामे मार्गी लावाल. आर्थिक व्यवहारात यश येईल. 


कुंभ:

मानसिक गुंतागुंतीत अडकू नका. शक्यतो कोणत्याही वादात अडकू नका. अडचणीतून मार्ग निघेल. विचारपूर्वक पाऊले उचला. निराशाजनक घटना दुर्लक्षित कराव्यात. 



मीन:

आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.  घरात नवीन वस्तूंची खरेदी केली जाईल. जुने परिचित लोक भेटतील. प्रवासात सावधगिरी बाळगणे हिताचे ठरेल. भावंडांना मदतीचा हात पुढे कराल. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies