Type Here to Get Search Results !

“........म्हणून चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल!



मुंबई: ठाकरे गट नेते चंद्रकांत खैरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात वक्तव्य करणे महागात पडले आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे त्यांच्याविरोधात औरंगाबाद शहरातील सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिंदे गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी सातारा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती. त्यावरून आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



दरम्यान, शिवसेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत खैरे  यांनी मुख्यमंत्र्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप केले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात औरंगाबाद शहरातील सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies