Type Here to Get Search Results !

सोशल मिडियावर ‘बाळासाहेब थोरातांच्या शिवसेनेचा’ धुमाकूळ: जाणून घ्या काय आहे प्रकरण!



मुंबई: निवडणुक आयोगाच्या निर्णयामुळे शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव मिळाले आहे. तर, ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं आहे. मात्र, सोशल मिडियावर बाळासाहेब थोरातांच्या शिवसेनेचा धुमाकूळ पहायला मिळत आहे. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे नक्की कोणाची असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. 


महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्यासह ‘बाळासाहेब’ या नावाने आणखी तीन नेते ओळखले जातात. मग, काय बाळासाहेब हे नाव वापरुन नेटकऱ्यांनी शिंदे गटाला ट्रोल केले आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (बाळासाहेब),  या नेत्यांचा फोटो वापर बाळासाहेबांची शिवसेना असे मीम्स तयार करण्यात आले आहे. बाळासाहेब थोरात आणि प्रकाश आंबेडकर यांच्या फोटोसह बाळासाहेबांची शिवसेना असे मिम्स सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.



दरम्यान, या मिम्सवर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.बाळासाहेब थोरातांची शिवसेना म्हणत असतील आणि माझा फोटो वापरणार असतील तर त्यांना मला रॉयल्टी द्यावी लागेल अशी मिश्किल प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.(सौ. tv9 मराठी)



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies