Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, बुधवार १२ ऑक्टोबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!




मेष:

धार्मिक गोष्टीत मन रमेल. मान्य नसलेल्या गोष्टीला सहमती दर्शवू नका. गुंतवणूक लाभदायक ठरेल. संमिश्र घटनांचा दिवस. लाभाच्या काही संधी प्राप्त होतील. 


वृषभ:

मानसिक शांतता जपावी. भागीदारीत काळजीपूर्वक पैसा गुंतवा. चटकन निर्णयावर येऊ नका. अती घाई टाळा. इतरांचे म्हणणे ऐकून घ्या. 


मिथुन:

कामातील बदलांना सामोरे जा. स्वत:वर खर्च करा. हितशत्रूंचा त्रास संभवतो. पराक्रम योग्य ठिकाणी दाखवा. नफा-तोट्याकडे लक्ष ठेवा. 


कर्क:

कुटुंबातील सदस्य समजून घेतील. अतीलोभ टाळावा. कामातून मनासारखे समाधान मिळेल. आपली जोखीम ओळखून कामे करा. दिलासादायक दिवस जाईल. 


सिंह:

आवडीच्या वस्तू खरेदी कराल. व्यावसायिक संधीकडे लक्ष ठेवा. आनंद वार्ता मिळू शकतील. हातातील अधिकार वापरता येतील. नवीन अनुभव गाठीशी बाळगाल. 


कन्या:

जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल.  योग्य सल्ल्याने लोकांचे समाधान कराल. जुन्या गोष्टी विसरून पुढे जा. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. जवळचे नातेवाईक भेटतील. 


तूळ:

कौटुंबिक गैरसमज दूर करावेत. नवीन संधीने खुश व्हाल. ज्येष्ठ मंडळींची गाठ पडेल. थोडी तडजोड करावी लागेल. अती श्रमामुळे थकवा जाणवू शकतो. 


वृश्चिक:

केवळ कामावर लक्ष केन्द्रित कराल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. वादाचे प्रसंग टाळा. मुलांची स्वतंत्र मते समजून घ्या. क्षुल्लक कारणांवरून चीडू नका. 


धनू:

समाधानकारक घटना घडतील. दिवस मनासारखा घालवाल. जोडीदाराशी मतभेद संभवतात. मनाला चांगल्या विचारात गुंतवून ठेवा. कौटुंबिक समस्या प्राधान्याने सोडवाव्यात. 



मकर:

उत्साहाने दिवसभर कार्यरत रहा.  तुमच्या शांत स्वभावाचा लोक गैरफायदा घेऊ शकतात. धार्मिक ग्रंथांचे वाचन चालू ठेवा. समोरील प्रश्न शांतपणे सोडवावेत. मानसिक स्वास्थ्य हरवू नका.

 

कुंभ:

चटकन धाडसी निर्णय घेऊ नका. लाभाची संधी सोडू नका. गुरुजनांचा सल्ला विचारात घ्या. वेळेचा सदुपयोग करावा. मनातील इच्छा पूर्ण होईल.


मीन:

अडकलेले पैसे प्राप्त होऊ शकतील.  व्यावसायिक ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. शक्तीच्या जोरावर समस्या सोडवू शकाल.  केलेल्या कामाचे समाधान मिळेल. तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies