अकोला: अकोल्यातील पातूर येथे आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी उर्जा मंत्री नितीन राऊत हे भारत जोडो यात्रा संदर्भात आढावा घेण्यासाठी आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी दसरा मेळाव्याबाबत वक्तव्य केले.
त्या म्हणाल्या, “उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कोविडची परिस्थिती सांभाळली ती खरोखर कौतुकास्पद आहे. मात्र, दसरा मेळावा हा शिवसेना पक्षाचा आहे. त्यामुळे आम्हाला भारत जोडो यात्रेकडे लक्ष द्यायचं आहे असे म्हणत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी आपला आणि सेनेच्या मेळाव्याचा संबंध नसल्याचे त्यांनी वक्तव्य केले.