Type Here to Get Search Results !

अखेर सहा तासानंतर चीनला जाणाऱ्या बॉम्बच्या विमानाचे झाले काय...? वाचा सविस्तर माहिती!नवी दिल्लीः तेहरानहून चीनला जाणाऱ्या विमानात सकाळी 9.20 वाजेच्या सुमारास बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर 9.30 वाजेच्या सुमारास विमानाचे भारतात दिल्लीत लँडिंग करण्याची मागितली होती. भारताने सुरक्षेच्या कारणास्तव ती नाकारली. पुढे दिल्ली ते जयपूर दरम्यानच्या आकाशात हे विमान तब्बल पाऊण तास घुटमळत होते.  त्यानंतर ते बांग्लादेशच्या दिशेने निघाले. अखेर हे विमान नुकतेच चीनमध्ये सुरक्षितरित्या लँड झाले आहे. माहितीनुसार, महान एअरलाइन्सची ही एअरबस 340 प्रवाशांना घेऊन इराणमधील तेहरानवरून चीनच्या ग्वांग्झू प्रांतात जात होती. दरम्यान सकाळीच पायलटला विमानात बॉम्ब असल्याचा संदेश मिळाला. त्यानंतर  पायलटने ऑपरेशन कंट्रोल सेंटरला ही माहिती दिली होती. त्यानंतर या विमानाचं चीनमध्ये सुरक्षित लँडिंग करण्यात आल्याचं महान एअरलाइन्सने कळवले आहे. तब्बल सहा तासांचा हा थरार आकाशात सुरु होता. दरम्यान, विमानात बॉम्ब असल्याची ही अफवाच ठरल्याचे उघडकीस आले आहे. महान एअरलाइन्सच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांना बदनाम करण्यासाठी हा फेक रिपोर्ट डिझाइन करण्यात आला होता, असे प्रथम दर्शनी वाटत आहे, असे महान एअरलाइन्सतर्फे सांगण्यात आले .टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies