Type Here to Get Search Results !

शिंदे गटाला ढाल-तलवारीचे चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी प्रतिक्रिया!



मुंबई:केंद्रीय निवडणूक आयोगाकडून बाळासाहेबांच्या शिवसेनेला 'ढाल-तलवार' चिन्ह देण्यात आले आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेला ढाल-तलवारीचं चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.



मुख्यमंत्री शिंदे ट्विट करत म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. 'आम्हीच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या विचारांचे खरे वारसदार. सज्जनांच्या रक्षणासाठी बनूनी ढाल, दुर्जनांच्या संहारासाठी हाती धरू तलवार...” असेही मुख्यमंत्री ट्विट करत म्हणाले.



तसेच,   'निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य, आता परफेक्ट काम झाले आहे. मराठमोळी निशाणी आहे. छत्रपती आणि त्यांच्या मावळ्यांची निशाणी आहे. हजारो लोक आमच्या सोबत येत आहेत. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे सर्वसामान्यांची शिवसेना आहे', असेही शिंदे म्हणाले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies