Type Here to Get Search Results !

“दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून तब्बल ४०० रुपये रोजंदारी नागरिकांला दिली जात आहे”



जळगाव : शिवसेनेत फूट पडल्यामुळे यंदा मुंबईत उद्धव ठाकरे गटाचा तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाचा असे दोन स्वतंत्र दसरा मेळावे होत आहेत. दसरा मेळाव्यासाठी पाचोर्याचे आमदार किशोर पाटील यांच्यातर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन केले जात असताना शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी बंधू आमदार किशोर पाटील यांच्यासह इतर आमदारांवर टीका केली आहे.




जे निष्ठावान शिवसैनिक आहे. त्यांना मुंबईच्या दसरा मेळाव्यासाठी गाडी घोडीची कुठलीही आवश्यकता नाही; असे जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते हजारोंच्या संख्येने उत्स्फूर्तपणे मुंबईच्या उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी रवाना झाले आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणावर बसेस तसेच वाहनांमधून कार्यकर्त्यांना मुंबईच्या मेळाव्यासाठी नेले जात आहे. तब्बल ४०० रुपये रोजंदारी ही मेळाव्यासाठी जाणाऱ्या नागरिकांला दिली जात असल्याची शोकांतिका असून असे दसरा मेळाव्याला यापूर्वी कधी घडले नव्हते; अशी टीका उद्धव ठाकरे समर्थक शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी शिंदे गटात सहभागी झालेल्या त्यांचे बंधू आमदार किशोर पाटील यांच्यासह इतर आमदारांवर केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies