मुंबई: शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा होणार आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, याचदरम्यान, शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी ट्वीट करत संदिपान भुमरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
दानवे म्हणाले,'सत्तारांची नमाज आणि भूमरेंची टोपी! व्वा रे हिंदू गर्व गर्जना यात्रा! म्हणे, गर्व से कहो हम हिंदू है! काय ती टोपी.. काय तो रुमाल.. काय ती फुसकी गर्जना! व्वा! ओक्के!', अशा शब्दात ट्विट करत अंबादास दानवे यांनी मंत्री भुमरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, दसरा मेळाव्यावरून शिवसेनेच्या दोन्ही गटात राजकारण तापले आहे.