Type Here to Get Search Results !

“पोलीस.. ओ पोलीस मी तुमच्याशी बोलतेय ....”पंकजा मुंडेचे मेळाव्यात मोठे वक्तव्य!



बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा आज सावरगाव येथे दणक्यात पार पडला. मात्र  पंकजा मुंडे यांचं भाषण सुरू असतानाच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. काही लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या तरुणांना पंकजा मुंडे यांनी खडसावले. तसेच पोलिसांनाही सबुरीने  घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.



पंकजा मुंडे म्हणाल्या, “ही पूर्ण सभा पोलीस.. पोलीस.. ओ पोलीस मी तुमच्याशी बोलतेय. एक मिनिट. सर्व सभा शांत आणि शिस्तीत आहे. समोरचे पाच सहा पोरं ज्यांनी डोक्याला पंचे बांधले. ते धिंगाणा करायलेत. तुम्ही आमचे असाल तर धिंगाणा करणार नाहीत. पोलिसांनी शांतपणे घेतलंय. तुम्हीही शांतपणे घ्या. हे लाल बांधलेला. सगळेजण शांत बसलेत. समोरच्या पाच मुलांनी माझं भाषण होईपर्यंत हाताची घडी तोंडावर बोट ठेवावं. धिंगाणा करायचं हे स्थान नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.



दरम्यान, पंकजा मुंडे यांचं भाषण झाल्यानंतर मेळाव्यात पुन्हा एकदा गोंधळ झाला. काही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली. त्यामुळे पोलिसांनी या कार्यकर्त्यांना लाठीचा चांगलाच चोप दिला. त्यामुळे मेळाव्यात गोंधळाचं वातावरण झाले  होते.

  



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies