Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, गुरुवार १३ ऑक्टोबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!




मेष :

मित्र गरजेच्या वेळी धावून येतील. जुनी रखडलेली कामे सामोरी येतील. हास्य विनोदात दिवसाचा उत्तरार्ध जाईल. मेहनतीचे चीज होईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. 



वृषभ:

गुंतवणुकीचा चांगला पर्याय सापडेल. विद्यार्थ्यानी आळस झटकून टाकावा. दिनक्रम व्यस्त राहील. घरातील कामांमध्ये गुंग व्हाल. स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्याल. 



मिथुन:

कामातील तांत्रिक बदलांकडे लक्ष ठेवा. हस्तकलेला वाव द्यावा. जोडीदाराच्या सल्ल्याने कृती कराल. जवळच्या प्रवासाचा योग येईल. बौद्धिक कस लागू शकतो. 



कर्क:

नवीन ओळखी होतील. लोकांना नावे ठेवायला जागा देऊ नका. वरिष्ठांच्या सल्ल्याशिवाय पुढे जाऊ नका. आपण आपले काम करीत राहा. आवडीनिवडी बाबत आग्रही राहाल. 



सिंह:

जुगारात लाभ होऊ शकतो. भाग्याची उत्तम साथ लाभेल. कोणत्याही निर्णयात संभ्रम आड आणू नका. प्रेमातील व्यक्तींना उत्तम दिवस. विचार करूनच निर्णय घ्या. 



कन्या:

खर्चाचा ताळमेळ बसवावा लागेल. घरासाठी नवीन खरेदी कराल.  स्वप्नातून जागे व्हा. जोडीदाराचा सल्ला विचारात घ्या. तडजोडीला पर्याय नाही. 



तूळ:

अतिरिक्त बोलणे टाळावे. शारीरिक ताण जाणवेल. मधाळ बोलून लोकांना आकर्षित कराल. उत्तम वैचारिक भूमिका घ्याल. दिवस आळसात जाऊ शकतो. 



वृश्चिक:

नवीन शिकण्याची संधी सोडू नका. जुन्या गैरसमजुती मनातून काढून टाका. प्रेमातील व्यक्तींनी संयम बाळगावा. आशावादी दृष्टिकोन कायम ठेवा. साहस करताना सतर्क राहा. 



धनू:

व्यवसायात प्रगती करता येईल. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. तरुण वर्गाकडून नवीन गोष्टी शिकाल. धार्मिक गोष्टीत दिवस व्यतीत कराल. वैवाहिक जीवन आनंदी असेल. 



मकर:

मुलांची कृती आनंद दायक असेल. आपल्यामुळे इतरांची गैरसोय टाळा. क्षुल्लक गोष्टींनी नाराज होऊ नका. कार्यक्षेत्रात प्रगती कराल. चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल. 



कुंभ:

आर्थिक निर्णय सावधगिरीने घ्यावेत. अतीअपेक्षा बाळगू नका. कौटुंबिक शांतता महत्त्वाची. मानसिक समतोल साधावा. बोलताना भान राखावे.


 

मीन:

हाता-पायांची काळजी घ्यावी. व्यायामाचा कंटाळा करू नका. हाती घेतलेले काम पूर्णत्वास जाईल. आहारावर नियंत्रण ठेवा. योग्य संधीसाठी थोडा वेळ द्यावा लागेल. 


 





 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies