Type Here to Get Search Results !

शिवसनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया...!



मुंबई: शिवसनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगान गोठवल्यामुळे हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. याबाबत आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 



उद्धव ठाकरे यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेयर केला आहे, ज्यात ते शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत दिसत आहे. या फोटोला त्यांनी 'जिंकून दाखवणारच' असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगानं गोठवलं असलं तरी उद्धव ठाकरे यांनी मात्र आपली शस्त्र खाल टाकली नसल्याचे स्पष्ट होतं. 



दरम्यान, या पोस्टनंतर शिवसैनिकही भावूक झाले आहेत. अनेक शिवसैनिकांनी "साहेब आम्ही तुमच्यासोबत आहोत" अशी कमेंट करत उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शवला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies