Type Here to Get Search Results !

धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय अपेक्षितच होता कारण…: पेडणेकरांनी केले स्पष्ट!



मुंबई:  मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी शिंदे गट आणि भाजपाला जोरदार टोला लगावला आहे.  पेडणेकरांनी शिंदे गटावर व भाजपावर देखील निशाणा साधला आहे.



शिवसेना आमची आहे, असं सांगणाऱ्यांनीच आईला बाजारात विकले. शिवसेना पक्ष नव्हे तर एक कुटुंब आहे. त्यामुळे काहीही झालं तरी आम्ही खचणार नाही, घाबरणार नाही असं पेडणेकरांनी म्हटलं आहे. 

तसेच, धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं हा तसा अनपेक्षित निर्णय नव्हता. असं काही तरी होणार हे आम्हाला अपेक्षित होतं. कारण ज्या पद्धतीने मागील काही दिवसांत उद्धव ठाकरे यांना फुटून गेलेल्या लोकांकडून आणि विरोधकांकडून घेरण्याचा प्रयत्न झाला त्यावरून ते स्पष्ट दिसत होतं. ज्या पद्धतीने हे वाचाळवीर बोलत होते, त्यावरून त्यांच्याकडून कोणीतरी ते बोलून घेत आहे असं वाटत होतं, असं पेडणेकर यांनी वक्तव्य केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies