Type Here to Get Search Results !

अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेला बसणार फटका? काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा देण्यास नकार?



मुंबई : शिवसेनीतील फूटीनंतर अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक नोव्हेंबरमध्ये पार पडत आहे. या निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी मात्र याबाबत वेगळी भूमिका मांडली आहे.



देवरा म्हणाले, “शिवसेनेला ही जागा सोडण्याऐवजी काँग्रेसनेही या निवडणुकीत उमेदवार उभा करायला हवा,  अंधेरी पोटनिवडणूक शिवसेनेप्रमाणे आपल्यासाठीही महत्त्वाची आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका काँग्रेससाठी हिताची ठरणार नाही, असे देवरा यांनी वक्तव्य केले आहे. 



दरम्यान, मात्र मिलिंद देवरा यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये मतभेद आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies