Type Here to Get Search Results !

“शिवसेनेच्या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीने ताकद लावली तर.....”: ‘यांचे’ मोठे वक्तव्य!



नगर: शिंदे गटाच्या मेळाव्याला बसेसमधून लोकं आणली जातील. पण शिवतिर्थावर होणाऱ्या मेळाव्यात स्वत:हून लोक येतील. शिवसेनेच्या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीने ताकद लावली तर मैदानात जागा पुरणारही नाही. पण शिवसेनेचीच ताकद एवढी आहे की त्यांच्या कार्यकर्त्यांमुळेच मैदानात जागा पुरणार नाही. स्वतःच्या हिंमतीवर ते ताकद लावून सभा घेत असतील तर राष्ट्रवादीला ताकद लावण्याची काय गरज? असा प्रश्न  रोहित पवार यांनी केला आहे.



दरम्यान, येत्या 5 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबईतील बीकेसी मैदानावर तर उद्धव ठाकरे यांचा दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होत आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मदत मिळत असल्याचा दावा भाजपने केला आहे. भाजपचा हा दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फेटाळला आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies