Type Here to Get Search Results !

“......त्यामुळे शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या": ‘यांची’ निवडणूक आयोगाकडे मागणी!



मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे आपलं म्हणणं मांडण्याची मुदत 7 ऑक्टोबरला म्हणजे उद्या संपत आहे.मात्र उद्धव ठाकरे यांनी एकही कागदपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे ठाकरे गट जाणून बुजून वेळ काढत असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. व शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.



तसेच, एकनाथ शिंदे गट सातत्याने आम्हीच शिवसेना असून आमच्या बाजूने विधीमंडळ पक्षातील एकूण सदस्यापैकी दोन तृतीयांश सदस्य आपल्या सोबत असल्याचे सांगत आहे. त्यामुळे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आपल्यालाच मिळावे असा दावा शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केला आहे.



दरम्यान, शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार याबाबतची निवडणूक आयोगासमोर होणारी सुनावणी उद्या होणार नसल्याची माहिती मिळत आहे. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies