Type Here to Get Search Results !

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरे गटाकडून लटकेऐवजी ‘यांना’ उमेदवारी मिळणार?



मुंबई: अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाने ऋतुजा लटके यांना उमेदवारी द्यायचे निश्चित केले आहे. मात्र, त्यांच्या राजीनाम्याचा मुद्दा समोर आल्याने आता ठाकरे गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. 



तसेच, लटके यांची उमेदवारी अडचणीत आल्यास ठाकरे गटाकडून दुसरी योजना तयार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यासाठी या नावांमध्ये माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, प्रमोद सावंत आणि कमलेश राय ही तीन नावेनिश्चित करण्यात आली आहे. तसेच,  लटके यांचे निकटवर्तीय उपविभाग प्रमुख अनिल खांडेकर यांनाही पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 



दरम्यान, नुकतीच ठाकरे गटाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याची बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies