मुंबई : शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हासंदर्भात आज निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यावर राऊतांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी शिंदेंवर टीका केली.
“आज दुपारी 2 वाजेपर्यंत सगळे पुरावे आम्ही निवडणूक आयोगासमोर ठेवणार आहोत. शिंदे गटाचे सगळे पुरावे तकलादू आहे. बोगस सदस्य नोंदणी आहे. 10 लाख सदस्य नोंदणी केलीय. त्यांची चौकशी व्हावी. मुख्यमंत्री अज्ञानात आहेत. त्यांना अभ्यास करावा लागेल, असे म्हणत राऊत यांनी शिंदेंवर टीका केली.