Type Here to Get Search Results !

MCA अध्यक्षपदासाठी शरद पवारांच्या गटाविरोधात ‘हा’ भाजप नेता मैदानात



मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील अध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर शरद पवार गटाकडून याआधीच संदीप पाटील यांनी अर्ज भरला आहे.



मिलिंद नार्वेकर आणि जितेंद्र आव्हाड हे दोघेही एमसीए निवडणूकीच्या रिंगणात उतरले असून नार्वेकर आणि आव्हाड यांनी स्वतंत्र अर्ज भरले आहेत. तर विहंग सरनाईक यांनी मुंबई प्रीमिअर लीगसाठी अर्ज भरला आहे.




दरम्यान, मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपत असून 20 ऑक्टोबरला एमसीएची निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies